पुणे : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभेत भाजप प्रणित NDA ला जोरदार बहुमत मिळाले आणि नुकताच मोदी सरकारचा शपथविधी पार पडला यामध्ये रिपाइं नेते (A) रामदास आठवले यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. पुण्यातील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी रिपाइंचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुणे रिपाइं चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका सुनीता वाडेकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हा अशोक कांबळे म्हणाले कि, “आमचे नेते रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे.समाजहितासाठी आठवले साहेब काम करतात आह्मी पक्षाच्या वतीने त्यांचे खूप अभिनंदन करतो. आम्हा कार्यकर्त्यांची फौज नेहमी तुमच्या पाठीशी राहील.”
पुण्यातील रिपाइं नेते परशुराम वाडेकर म्हणाले “रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पहिले असे नेते आहेत, ज्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की, रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे. पद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यामंध्ये खूप आनंदाचे वातारण निर्माण झाले आहे. ” रामदास आठवले तुम आगे बढो’ , हम तुह्मारे साथ है रिपब्लिकन पार्टीचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणाही देण्यात आल्या .