मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जिओने 5G बरोबर स्मार्ट ग्लास नावाच्या एका चष्माचे अनावरण केले आहे. मुख्य म्हणजे, या चष्म्याच्या मदतीने तुम्हाला 3D भेटीचा अनुभव मिळणार आहे. या चष्म्याला JioGlass असे नाव दिले आहे. यात स्पीकर व माइक दोघांचा सपोर्ट दिला आहे. या स्मार्ट ग्लासच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंगचाही फायदा घेता येणार आहे. भारतात ही सेवा देणारी जिओ पहिली कंपनी ठरली आहे. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ 5G रोडमॅपचे अनावरण केले असून हा रोडमॅप पूर्णपणे भारतामध्ये विकसित केला आहे. जिओ 5Gची ही सेवा 2021 मध्ये ग्राहकांसाठी प्रीमियर करणार आहे. रिलायन्स समूहाची 43 वी एजीएम नुकतीच झाली.
आज अनावरण केलेल्या या जिओ ग्लासचे वजन 75 ग्रॅम असून हा एक व्हर्च्युअल रिऍलिटीचा अनुभव देणारा चष्मा आहे. या चष्म्याला जोडण्यासाठी एकच केबल आहे. आधीपासूनच यात 25 अॅप्स आहेत जे व्हिडीओ मीटिंग्ससाठी फायदेशीर ठरतात. जिओ ग्लास एक केबलसह आला असून जो आपण आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. जिओ ग्लास 3D मीटिंग्ज आणि व्हिडिओ कॉलसाठी फार फायदेशीर आहे. युझर जियो ग्लाससह व्हर्च्युअल स्क्रीनमध्ये सादरीकरण करू शकता.
जिओ 5Gची ही सेवेचे 2021 मध्ये ग्राहकांसाठी प्रीमियर केली जाणार आहे. 2021 पासून ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध होईल. दरम्यान, इतर देशांमध्येही ही सेवा सुरू करणार आहे. ‘भारतामध्ये पूर्णपणे विकसीत केलेल्या सुविधा जागतिक स्तरावर पोहोचविण्यात येणार आहे. अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. जिओ प्लॅटफॉर्म ‘आत्मनिर्भर भारतासाठीचे महत्त्वाचे उदाहरण ठरणार आहे, अशी घोषणा अंबानी यांनी केली.