बहुजननामा :ऑनलाईन टीम – जगभरात इंटरनेट कनेक्टिव्हिटीने एकमेकांना जवळ आणले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. रिलायन्सने जिओमीट अॅपने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपला भारतीय पर्याय आला आहे. रिलायन्स जिओने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी एक नवीन अॅप लाँच केले आहे. जिओमीट अॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झाले असून याच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, हे अॅप पूर्णतः मोफत असणार आहे.
या अॅपची वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे 100 पेक्षा जास्त जणांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येतील. जिओमीट अॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला सपोर्ट करत असल्याचे कंपनीने सांगितले. जिओमीट अॅपमध्ये मिटिंग शेड्यूल करण्यापासून, स्क्रीन शेअर करण्यासारखे अनेक फीचर्स आहेत. या अॅपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोड किंवा इन्व्हाइटची गरज लागत नाही.
डेस्कटॉपवरुन काम करणारे युजर्स गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवरुनही गळेचशशीं चा वापर करु शकतात.लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे जिओमीट अजून एक पर्याय युजर्सकडे आला असून याद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लोकप्रिय असलेल्या झूम अॅपला थेट टक्कर मिळणार आहे.