नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ च्या डिसेंबरपासून रिलायन्स जिओसोबत एअरटेल आणि वोडाफोन यांनी आपले प्रीपेड प्लॅन महाग केले असून एअरटेल-आयडिया यांनी नवीन प्लॅन्समध्ये आपल्या युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंग देत आहेत. तर रिलायन्स जिओने युजर्सला दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करायचा असल्यास प्रति मिनिट ६ पैसे चार्ज लावला आहे. कंपनी इंटरकनेक्ट युसेज चार्जच्या नावाखाली हे पैसे असून कॉलिंगसाठी ६ पैसे मोजायचे नसल्यास काही पर्याय आहेत.
युजर्सने त्यातील पर्याय निवडले तर हे पैसे मोजावे लागणार नाहीत. रिलायन्स जिओने भारतात नुकतेच वाय-फाय कॉलिंग आणले असून ते देशभरात कोणत्याही वायफाय नेटवर्कवरून काम करू शकते. तुम्हाला आययूसीसाठी जर पैसे मोजायचे नसतील तर हा ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे. वायफाय कॉलिंग ही फ्री सुविधा असून ग्राहक आरामात व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल करू शकतात. सध्या वायफाय कॉलिंग १५० पेक्षा जास्त स्मार्टफोन्सला सपोर्ट करत असून तुमच्याकडे वायफाय नेटवर्कचा ऍक्सेस नसेल तर कॉलिंगसाठी व्हाट्सऍप, टेलिग्राम किंवा गुगल डुओसारख्या ऍप्सचाही वापर करू शकता. त्यामुळे तुमचे पैसे वाचतील.
तसेच आयफोन युजर्स Face Time चा वापर करू शकतात. जिओने आपल्या अनेक प्रीपेड प्लान्सला अपडेट केले असून यात डेटासोबत दुसऱ्या नेटवर्क्ससाठी कॉलिंग मिनिट्स मिळतात. सोयीनुसार तुम्ही कोणताही एक प्लॅन निवडू शकता. हा प्लॅन ज्यांच्याकडे असेल त्यांना ६ पैसे प्रति मिनिट द्यावे लागणार नाहीत. IUC चार्ज म्हणजे एक टेलिकॉम ऑपरेटर असून तो दुसऱ्या ऑपरेटर युजर्सला कॉल देतो.