बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी Reliance Jio केवळ प्रीपेड पॅक, पोस्टपेड प्लान आणि डेटा प्लान ऑफर करीत नाहीत, तर कंपनीकडे टॉप अप वाउचर सुद्धा आहेत. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना टॉक टाइमसाठी 6 टॉप अप व्हाऊचरचा पर्याय दिला आहे. या व्हाऊचरची सुरुवात फक्त 10 रुपयांपासून होत असून त्याची जास्तीत जास्त किंमत 1 हजार रुपये आहे. जाणून घ्या रिलायन्स जिओच्या या टॉप अप वाउचरसंबंधी सर्वकाही.
10 रुपयांचा जिओ टॉप अप व्हाऊचर
रिलायन्स जिओच्या 10 रुपयांच्या टॉप अप व्हाऊचरमध्ये 7.47 रुपयांचा टॉक टाइम मिळतो. या टॉपची वैधता अनलिमिटेड आहे.
20 रुपयांचा जिओ टॉप अप व्हाऊचर
या व्हाऊचरमध्ये 14.95 रुपयांचा टॉक टाइम दिला जातो. याची वैधता सुद्धा अनलिमिटेड आहे.
50 रुपयांचा जिओ टॉप अप व्हाऊचर
या व्हाऊचरमध्ये 39.37 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. या व्हाऊचरमध्ये सुध्दा अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
100 रुपयांचा टॉप अप व्हाऊचर
या व्हाऊचरमध्ये 81.75 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. व्हाऊचरची वैधता अनलिमिटेड आहे.
500 रुपयांचा जिओ टॉप अप व्हाऊचर
या टॉप अप व्हाऊचरमध्ये 420.73 रुपयांचा टॉक टाइम ऑफर केला जात आहे. याची वैधता सुद्धा अनलिमिटेड आहे.
1 हजार रुपयांचा जिओ टॉप अप व्हाऊचर
या टॉप अप व्हाऊचरमध्ये 844.46 रुपयांचा टॉक टाइम मिळतो. याची वैधता अनलिमिटेड आहे.