Reliance Jio | या दिवाळी मध्ये व्हा 2जी मुक्त, जिओ भारत मोबाईल सह फक्त ₹699 पासून उपलब्ध

Reliance Jio | This Diwali, go 2G free, available with Jio Bharat Mobile starting at just ₹699

स्वस्त रिचार्ज, भरपूर मनोरंजन आणि सोपे UPI व्यवहार.

Reliance Jio | रिलायन्स जिओने “2जी मुक्त भारत मोहिमे”अंतर्गत महाराष्ट्रातील ग्राहकांना 2जीवरून 4जीवर अपग्रेड करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. या दिवाळीत जिओ भारत मोबाइल फोन अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असून त्यांची सुरुवातीची किंमत फक्त ₹699 आहे. कंपनीचे उद्दिष्ट राज्यांतील 1 कोटीहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आहे, जे अजूनही 2जी नेटवर्कचा वापर करत आहेत. जिओ केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कार्य करते आणि डिजिटल इंडियाच्या रोडमॅपला पुढे नेत आहे.

महाराष्ट्रामध्ये जिओ भारत V4 मॉडेल झपाट्याने लोकप्रिय होत आहे, कारण त्याचे मासिक रिचार्ज सर्वात किफायतशीर आहे. ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लानसाठी फक्त ₹123 द्यावे लागतात. या प्लानमध्ये 14 GB डेटा आणि अमर्याद कॉलिंगचा समावेश आहे. तर इतर टेलिकॉम कंपन्यांचे प्लान ₹199 पासून सुरू होतात, ज्यात केवळ 2 GB डेटा दिला जातो. अशा प्रकारे जिओ भारतचा रिचार्ज सुमारे 38 टक्क्यांनी स्वस्त आहे. जिओ भारतचा वार्षिक प्लान देखील उपलब्ध असून त्यासाठी ग्राहकांना फक्त ₹1234 द्यावे लागतात.

जिओ भारत फोन केवळ स्वस्त इंटरनेट पुरवतो असे नाही, तर तो मनोरंजन आणि दैनंदिन गरजांचीही पूर्तता करतो. ग्राहकांना जिओ हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन, जिओ सावनवरील 8 कोटीहून अधिक गाण्यांचा आनंद आणि जिओ टीव्हीवरील 600 हून अधिक चॅनेल पाहण्याची सुविधा मिळते. त्यासोबतच जिओ पेच्या माध्यमातून ग्राहक सहजपणे UPI व्यवहार करू शकतात. व्यापारी आणि दुकानदारांसाठी जिओकडून मोफत पे साउंड बॉक्सची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.