मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रिलायन्स जिओने Motorola च्या नवीन ‘Motorola Razr 2019’ या स्मार्टफोनसाठी eSim सपोर्ट देण्याची घोषणा केली असून जिओची ही सेवा भारतात अगोदरपासूनच उपलब्ध आहे. यात जिओकडून आपल्या ग्राहकांना दुप्पट डेटा आणि व्हॅलिडिटीची ऑफर असून तुम्ही जिओ eSim द्वारे ग्राहक Moto Razr स्मार्टफोनच्या माध्यमातून कॉल करू शकता. सोबतच ग्राहक डेटा आणि जिओ ऍप्सचाही वापर करू शकतात. कोणतेही सिम कार्ड इन्सर्ट न करता सर्व सेवांचा वापर करता येणार असून Moto Razr युजर्सना जिओची एक वर्षाची अनलिमिटेड सर्व्हिस कोणत्याही अतिरिक्त शूल्काशिवाय मिळेल. तसेच जिओच्या ४,९९९ रु.च्या प्लॅनमध्ये दुप्पट डेटाचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३५० जीबी + ३५० जीबी हाय स्पीड डेटा कोणत्याही डेली लिमिटशिवाय मिळेल. सोबत एक वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचाही लाभ मिळेल.
Motorola Razr 2019: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स, किंमत –
सोमवारी ‘मोटोरोला’ने आपला आयकॉनिक Motorola Razr 2019 हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला असून हा जगातील पहिला कॅमशेल स्टाइलचा फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोन आहे. ६.२ इंच फ्लेक्सिबल ओलेड एचडी + डिस्प्ले असून डिस्प्ले पॅनलला पूर्ण फोल्ड करता येते. फोनमध्ये एक सेकंडरी २.७ इंच ओलेड क्विक व्ह्यू स्क्रीन आहे. या स्क्रीनचा वापर सेल्फी घेण्यासाठी, नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि म्यूझिक कंट्रोल व गुगल असिस्टंटसाठी करता येतो. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम आहे. तसेच नाइट व्हिजन मोडसह १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून अंधारातही ब्राइट फोटो घेता येईल, असा कंपनीचा दावा आहे. कॅमेऱ्यामध्ये ऑटो सीन डिटेक्शन, पोर्ट्रेट लायटिंग असून फोन फोल्ड केल्यानंतर हा कॅमेरा सेल्फीसाठीही वापरता येतो.
तसेच, हँडसेटच्या मुख्य डिस्प्ले नॉचच्या वर एक ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. २०५ ग्रॅम वजन असलेल्या या फोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मेमरी असून हा फोन अँड्रॉइड ९ पायवर कार्यरत असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी यांसारखे फीचर्स आहेत. तर 2510mAh क्षमतेची 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरीही आहे. ही बॅटरी एक दिवसाचा बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे. भारतात नव्या Motorola Razr 2019 ची किंमत १ लाख २४ हजार ९९९ रुपये असून याच्या प्री-बुकिंगला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. तर २ एप्रिलपासून विक्री सुरू होणार असून फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून फोनसाठी प्री-बुकिंग सुरू आहे. अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत १,५०० डॉलर आहे.