Reena Jha Tripathi At Bhau Rangari Ganpati | पुणे : प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स रीना झा-त्रिपाठी यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे: Reena Jha Tripathi At Bhau Rangari Ganpati | शहरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. त्यामुळे शहरात गर्दी वाढत आहे. दरम्यान, प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स रीना झा-त्रिपाठी (Reena Jha Tripathi, Principal Chief Commissioner of Income Tax, Pune) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली.
यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स रीना झा-त्रिपाठी यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो.
त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची उपस्थिती आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पाच्या दर्शनाला गर्दी वाढताना दिसत आहे.
Comments are closed.