नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती होत असून बँकेत क्लार्कची 8114 पदे भरण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी आहे.
26 जानेवारीपर्यंत अर्जातील चुका सुधारता येणार आहेत. उमेवाराचे वय 1 जानेवारी 2020 ला किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. एससी आणि एसटी श्रेणीतील उमेवारांना वयात 5 वर्षांची आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 3 वर्षांची सुट देण्यात आली आहे.
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. 19 एप्रिलला लेखी परीक्षा होणार आहे. 11 फेब्रुवारीला लेखी परीक्षेचे अॅडमिट कार्ड वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल.
हिमाचलमधील उमेदवारांसाठी लेखी परीक्षा बिलासपुर, हमीरपुर, कांगड़ा, कुल्लू, मंडी, शिमला आणि ऊनामध्ये होईल. हिमाचलसाठी 180 पदे आहेत. परीक्षा दोन टप्पयात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा 100 गुणांची असेल तर दुसरी 200 गुणांची असणार आहे.
सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी 750 रुपये आणि एससी, एसटी वर्गासाठी कोणतीही फी नाही. फी डेबिट आणि नेटबँकिंगच्या माध्यमातून भरता येईल. उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियामधील या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवरून सविस्तर माहिती घ्यावी. लोकसेवा केंद्रामध्येही फार्म ऑनलाईन भरता येणार आहे.