नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशातील बँकांमध्ये क्लर्कच्या रिक्त पदांसाठी 12 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनलने(IBPS) घोषणा केली आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये क्लर्कच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यातील 12 हजार रिक्त जागांपैकी महाराष्ट्रातील बँकांमध्ये 1,257 जागांचा समावेश आहे.
देशातील बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडीकेट बँक, आंध्रा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॅनरा बँक, अलाहाबाद बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, यीसीओ बँक इत्यादी बँकांमध्ये एकूण 12 हजार रिक्तपदांसाठी भरती होणार आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि 20 ते 28 वर्ष वयोगटातील इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी 17 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2019 च्या दरम्यान ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2019 आहे. अर्ज करणाऱ्याना नोव्हेंबर महिन्यात हॉल तिकीट जाहिर करण्यात येतील.
आधी आयबीपीएस क्लर्क प्रिलियम्स परीक्षा आणि नंतर आयबीपीएस क्लर्क परीक्षा होणार आहे. या प्रक्रियेतूनच ही भरती केली जाणार आहे. आयबीपीएस क्लर्क प्रिलियम्स परीक्षा डिसेंबरमध्ये 7,8,14 आणि 15 तारखेला घेण्यात येणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांसाठी एकाच वेळी अर्ज करणे गरजेचे आहे.
भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आयबीपीएसची वेबसाईट https://www.ibps.in वर जाऊ शकता. याशिवाय तुम्ही https://www.adda247.com/jobs/wp-content/uploads/2019/09/IBPS-CRP-Clerk.pdf या लिंकवरूनही सर्व माहिती डाऊनलोड करू शकता.