मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असताल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी ८०६ जागांवर भरती प्रक्रिया सुरु होणार असून त्यासाठी जे इच्छुक आहेत ते अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून इच्छुक असलेले १९ मार्च २०२० पर्यंत अर्ज करू शकतात.
काय आहे पद आणि किती आहे पदसंख्या?
१. सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant section Officer) – ६७ जागा
२. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) – ८९ जागा
३. पोलीस उपनिरीक्षक (Police sub inspector) – ६५० जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १९ मार्च २०२०, २३.५९ वाजेपर्यंत आहे.
काय आहे शैक्षणिक पात्रता?
मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी
मराठी भाषेचे ज्ञान
वयाची अट
१ जून २०२० रोजी १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय – ५ वर्ष सूट)
वेतनमान –
३८,६०० रुपये ते १,२२,८०० रुपये आणि इतर भत्ते
या पदासाठीच्या परीक्षा शुल्क ३७४ रुपये (मागसवर्गीय/अनाथ – 274 रुपये) असून नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात असेल. तर तुमचे परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर आयोजित केले जाणार आहे.
असा करा अर्ज –
उमेदवार https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या वेबसाइटवर अर्ज करु शकतात. तसेच या वेबसाइटवरुन उमेदवारांना परिक्षा शुल्क ऑनलाइनही भरता येईल.
वय, शारीरिक अर्हता या संबंधित माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/05-2020.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-recruitment-28022020.html