नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही रेल्वेत नोकरी करण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) जयपूरने ट्रेड अप्रेंटीसच्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI धारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 8 नोव्हेंबर 2019 पासून सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2019 आहे.
संस्थेचं नाव- रेल्वे रिक्रूटमेंट सेल(RRC)
पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता- उमेदवाराने कोणत्याही विषयात मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावीची परीक्षा पास केलेली असावी. सोबतच त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.
अर्ज शुल्क- सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल.
वयोमर्यादा- अर्जदाराचे वय 8 डिसेंबर 2019 रोजी किमान 15 वर्ष आणि कमाल 24 वर्ष असावं. तसेच आरक्षित प्रवर्गातील अर्जदाराला कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
महत्त्वाच्या तारखा-
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख- 8 नोव्हेंबर 2019.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख- 8 डिसेंबर 2018
कसा कराल अर्ज ?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला रेल्वे रिक्रूटमेंट सेल जयपूरची अधिकृत वेबसाईट http://www.rrcjaipur.in/ ला भेट द्यावी लागेल.