बहुजननामा ऑनलाईन टीम : तुम्ही जे सरकारी बँकेत नोकरी शोधात असाल, तर ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण अनेक सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. एसबीआय, रिझर्व्ह बँक आणि आयबीपीएसद्वारे भरती सुरु आहे. त्यात आयबीपीएस १२ हजार क्लार्क पदांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. आयबीपीएस क्लार्क पदासाठी अर्ज सुरू केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल ७०० पदांवर भरती होणार असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये देखील Grade B साठी १९९ पदांवर भरती सुरु आहे.
IBPS क्लार्कच्या १२ हजार पदांवर भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू आहे. अर्ज करण्यासाठी www.ibps.in या सांकेतिक स्थळावर भेट देऊन आपण अर्ज दाखल करू शकता. यात आंध्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, इलाहाबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, भारतीय बँक, पंजाब आणि सिंध बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये ही नोकरी भरती होणार आहे.
SBI मध्ये अप्रेंटिससाठी ७०० पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ६ ऑक्टोबर २०१९ ही अर्जाची शेवटची तारीख आहे . त्यासाठी sbi.co.in/career या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकतो.
SBI चं नोटिफिकेशन पाहायला
https://sbi.co.in/webfiles/uploads/files/careers/2019_09_1225_SBI_Web_Page_Engagement_of_Apprentices_Notice.pdf या वेबसाईटला भेट द्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Grade B (DR)च्या ऑफिसर पदांसाठी १९९ पदांची भरती सुरु आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ . rbi.org.in या सांकेतिक स्थळावर जाऊन आपण अर्ज करू शकतो. RBI चं नोटिफिकेशन https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3766 इथे पाहू शकतो.
Visit : bahujannama.com