नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्राप्तीकर कायद्यानुसार नातेवाईकाडून घेतलेली मदत, उधार किंवा पैसे डोनेशनच मानले जाते आणि कायदा याकडे गिफ्ट म्हणून पाहतो. प्राप्तीकर कायद्यानुसार सर्व गिफ्ट टॅक्सच्या कक्षेत येत नाहीत. काहींना यातून सूट सुद्धा मिळाली आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला वर्षभरात गिफ्ट स्वीकारण्याची एक मर्यादा आहे. इतकेच नव्हे, काही खुपच जवळच्या नातेवाईकांकडून घेतलेली मदत टॅक्स फ्री सुद्धा असते. आता कोरोना काळात नातेवाईकांकडून मदत घ्यावी लागली असेल तर जाणून घ्या की कुणाकडून घेतलेली आणि किती रक्कम टॅक्स-फ्री होईल.
प्राप्तीकर कायद्याच्या हिशेबाने एका व्यक्तीला वर्षभरात कमाल 50,000 रुपये किंमतीच्या गिफ्टवरच टॅक्समधून सूट मिळते. परंतु हे गिफ्ट स्वीकारण्याची कौटुंबिक नव्हे तर व्यक्तिगत सीमा आहे. याचा अर्थ कुटुंबातील प्रत्येक सदस्य दरवर्षी कमाल 50,000 रुपयांपर्यंत टॅक्स-फ्री गिफ्ट स्वीकरू शकतो. यामध्ये रोकड किंवा एखाद्या वस्तूच्या रूपात गिफ्ट असू शकते. मात्र, काही नातेवाईकांकडूनच घेतलेली मदत किंवा गिफ्ट टॅक्स-फ्री असते.
जर वरील नियम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर, समजा तुमच्या कुटुंबात 5 सदस्य आहेत आणि सर्वांनी केवळ कोरोना काळात आपल्या नातेवाईकांकडून गिफ्ट म्हणून मदत स्वीकारली आहे. अशावेळी प्रत्येक आपला व्यक्ती 50-50 हजार रुपयांची टॅक्स-फ्री मदत स्वीकारू शकतो. अशाप्रकारे एक कुटुंब म्हणून कमाल 2.5 लाख रुपयांची नातेवाईकांकडून घेतलेली मदत टॅक्स-फ्री होईल.
वर सांगितलेल्या 50,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त गिफ्टमध्ये मिळालेली रक्कम करदात्याला अन्य स्त्रोतांकडून उत्पन्न म्हणून दाखवावे लागेल. या रक्कमेवर लागणारा कर हा टॅक्स-स्लॅबच्या आधारावर भरावा लागेल. मात्र, संकटाच्या या काळात या मदतीवर टॅक्सचा नियम खुपच दुखदायक आहे, परंतु काही जवळच्या नातेवाईकांकडून घेतलेली मदत पूर्णपणे टॅक्स-फ्री असते.
टॅक्स एक्सपर्ट बलवंत जैन यांच्यानुसार सर्व डोनेशन किंवा गिफ्ट टॅक्सच्या कक्षेत येत नाही. अतिशय जवळच्या नातेवाईकांकडून घेतलेले गिफ्ट किंवा उधार (मदत) वर टॅक्स लागत नाही आणि ते पूर्णपणे टॅक्स-फ्री असते. जवळच्या नातेवाईकांमध्ये एखाद्या व्यक्तीचे भाऊ-बहिणी किंवा आई-वडील, आई-वडीलांचे भाऊ-बहिण, या सर्वांचे जोडीदार इत्यादी येतात. अशावेळी जर तुम्ही या लोकांकडून मदत घेतली असेल तर ती पूर्णपणे कर-मुक्त होईल.