नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोकांची तक्रार असते की काळाप्रमाणे त्यांचे वजनदेखील वेगाने वाढत आहे. यापाठीमागे अनेक कारणे असू शकतात. असे तुमच्या बाबतीत सुद्धा होत असेल तर अस्वस्थ होऊ नका. हे समजून घ्या की तुमचे वजन वाढत आहे. वजन वाढण्याची कारणे आणि त्यावर नियंत्रण कसे मिळवावे ते प्रसिद्ध डाएटेशियन डॉ स्मीता सिंह यांच्याकडून जाणून घेवूयात…
1. पोटात बॅक्टेरिया वाढल्याने वाढू शकते वजन
आपल्या शरीरात बॅक्टेरियोडाईस आणि फर्मक्यूटीस दोन बॅक्टेरिया आढळतात. ज्यांचे वजन जास्त असते त्यांच्यात फर्मक्यूटीस बॅक्टेरिया जास्त असतात. यासाठी चांगला आहार घ्या. हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्यासाठी प्रीबायोटिक्स फूड्सवर फोकस करा. जसे की, कांदा, लसून, केळे आणि अँटीबायोटीक्सचे सेवन कमीत कमी करा.
2. फ्लोराईड युक्त पाणी नुकसानकारक
वजन वाढण्याचे कारण पाण्यातील फ्लोराईड सुद्धा असू शकते. फ्लोराइडयुक्त पाणी प्यायल्याने वजन वाढते. काही दिवस मिनरल वॉटर किंवा साधे पाणी प्या. चांगला परिणाम झाला तर फ्लोराईडयुक्त पाणी पिऊ नका.
3. कॅलरी काऊंट केल्याशिवाय खाण्याने वाढतो लठ्ठपणा
फास्ट फूडमुळे शरीरातील कॅलरी वाढतात. जेव्हा काही खायचे असेल तेव्हा कॅलरी आवश्य काऊंट करा. कॅलरी काऊंट अॅप्ससुद्धा आहेत. रोजचे डाएट लिहून पाहू शकता की पूर्ण दिवसात किती कॅलरीज कंज्यूम करत आहात.
4. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढू शकते वजन
शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वजन वेगाने वाढू शकते. एक्सपर्टनुसार जे लोक व्हिटॅमिनचे सेवन करतात त्यांना भूक कमी लागते. तर व्हिटॅमिनचे सेवन करत नाहीत त्यांना खाल्ल्यानंतर पुन्हा भूक लागते आणि वजन वाढते. यासाठी डाएटमध्ये व्हिटॅमिन वाढवा, यासाठी रोज एक बाऊल मिक्स फ्रुट किंवा व्हेजिटेबल सलाड खा.
5. लीव्हरवर भार येऊ देऊ नका
लीव्हर आपल्या शरीराचा फॅट बर्निंग पार्ट आहे. जेव्हा तुम्ही काही जास्त फॅटी खाता तेव्हा लीव्हरला ते पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. जोर लावावा लागत असल्याने लीव्हरला फॅट पचवण्यास वेळ मिळत नाही. यामुळे वजन वढते. यासाठी
फॅटी पदार्थ खाऊ नका, भरपूर पाणी प्या.
6. मोठ्या प्लेटमध्ये खाण्याचे तोटे
प्लेटच्या आकाराचे कनेक्शन सुद्धा हेल्थशी आहे. मोठ्या प्लेटमध्ये जास्त वाढून घेऊ शकता. यासाठी छोट्या प्लेटमध्ये खा. प्लेटमध्ये फळे किंवा सलाडने जास्त भरा. यामुळे लवकर वजन कमी होईल.
7. डाएट ड्रिंक्सने वाढू शकते वजन
जर तुम्ही डाएट ड्रिंक्स हेल्दी समजून सेवन करत असाल तर आरोग्य बिघडू शकते. डाएट ड्रिंक्सच्या सेवनाने लठ्ठपणा वाढू शकतो. कारण यात स्वीटनरचा वापर केला जातो. कॅलरी वाढतात. डाएट ड्रिंक्स ऐवजी हर्बल टी, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी प्या.