नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता जर शासकीय पेन्शन मिळण्यास विलंब होत असेल तर त्यासाठी तुम्हाला वार्षिक ८ टक्के व्याजही मिळेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व सरकारी निवृत्तीवेतन बँकांना सांगितले आहे की जर त्यांनी पेन्शन क्रेडिट करण्यात उशीर केला तर त्यांना भरपाई म्हणून वर्षाकाठी ८% जीएसटी द्यावा लागेल.
१ ऑक्टोबर २००८ नंतरच्या सर्व पेन्शन धारकांवर हा नियम लागू होईल. पेन्शन धारकांना या सवलतीचा फायदा घेण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पेन्शन उशिरा मिळाल्यावर पेन्शन कर्त्याला वार्षिक आठ टक्के इतके व्याज दिले जाणार आहे. याबाबत सरकारी बँकांना आदेश देण्यात आले आहेत. की अधिक रक्कम वाचवण्यासाठी लवकरात लवकर बाकी असलेल्या पेन्शन देऊन टाकणे.
या बाबतची सर्व माहिती आणि मदत पेन्शन कर्त्यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या ठिकाणाहून मिळू शकते. ज्याचे वय जास्त आहे. अशा सिनिअर सिटिझन्सची पेन्शन लवकरात लवकर देण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com