नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचा आर्थिक कणा असलेल्या आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आरबीआयमध्ये डेटा ॲनालिस्ट, कन्सल्टंट, अकाऊंट स्पेशालिस्टसह एकूण 39 पदांवर भरती आयोजित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे केवळ मुलाखतीद्वारेच उमेदवाराची निवड होणार आहे. या जागांसाठी 3 ऑगस्ट पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल आहे. RBI Recruitment 2020 या नुसार एकूण 39 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 पर्यंत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या पदांसाठी उमेदवारांचे शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड करण्याचे ठरवले आहे. या नुसार पदांची भरती केली जाणार आहे. अकाऊंट स्पेशालिस्टसाठी उमेदवारांकडे सीएची पदवी असणे आवश्यक आहे. या सर्व पदांनुसार उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे असावे. आरबीआयमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आरबीआयच्या अधिकाकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. आरबीआयमध्ये या पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना निवडले जाणार आहे.
भरतीच्या माहितीसाठीची लिंक https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3846