नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व बँक मध्ये अनेक पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती ९२६ सहाय्यक पदांवर होणार आहेत. उमेदवाराची अंतिम तारीख १६ जानेवारी २०२० निश्चित करण्यात आली आहे. वय मर्यादा, पात्रता, स्थान, आरबीआय सहाय्यक ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबत अधिकृत सूचना पहा.
पोस्ट जागा वेतन
सहायक अधिकारी ९२६ ३६,०९१ (प्रति महिना)
शैक्षणिक पात्रता
कमीतकमी ५० % गुणांसह कोणत्याही विषयात पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा
अर्जदाराचे कमीत कमी वय २० वर्ष आणि जास्तीत जास्त २८ वर्ष ठेवण्यात आले आहे.
अर्ज शुल्क
जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारासाठी – ४५० रुपये
SC / ST / PWD / Ex-S अर्जदारासाठी – ५० रुपये
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीक – २३ डिसेंबर २०१९
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीक – १६ जानेवारी २०२०
शुल्क भरण्याची अंतिम तारीक – १६ जानेवारी २०२०
ऑनलाइन सुरवातीची परीक्षा तारीक – १४ आणि १५ फेब्रुवारी २०२०
ऑनलाइन मुख्य परीक्षा तारीक – मार्च २०२०
कसा कराल अर्ज
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://www.rbi.org.in/ च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज २३/१२/२०१९ ते १६ जानेवारी २०२० पर्यंत पाठवू शकता.
नोकरीचे स्थान – अखिल भारतीय
निवड प्रक्रिया – निवड ऑनलाइन सुरुवातीची परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि भाषेनुसार प्रवीणता परीक्षा (LPT) वर आधारित असेल.