नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो दर ५.१५ टक्के ठेवला आहे. एमपीसीच्या सर्व ६ सदस्यांनी व्याज दर न बदलण्याच्या बाजूने मतदान केले. सलग दुसर्या बैठकीसाठी रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे. त्याच वेळी, रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्के राहील. रिझर्व्ह बँकेने सीआरआर ४ टक्के आणि एसएलआर १८.५ टक्के राखला आहे. यापूर्वी आरबीआयने सलग ५ वेळा व्याज दरात कपात केली होती. आरबीआयने व्याज दर न बदलल्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मुदत ठेवीवर (एफडी) होईल. व्याज दर न बदलण्याचा एफडीवर कसा परिणाम होईल.
एफडीमुळे गुंतवणूकदारांवर परिणाम
व्याज दर कायम ठेवण्याच्या आजच्या निर्णयाचा अर्थ असा होईल की बँकेद्वारे एफडी दरात कोणताही बदल अंतर्गत घटकांमुळे होईल. ज्यामध्ये विविध बँकांच्या निधी आवश्यकतांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आरबीआयने सलग ५ वेळा रेपो दर कमी केला होता. रेपो दरात कपातीचा फिक्सड डिपॉझिटवरील रिटर्न्सवर परिणाम झाला. डिसेंबर २०१९ मध्ये आरबीआयने व्याज दरात बदल केला नाही. यानंतर एसबीआयने एफडीवरील व्याजदर एका ठराविक मुदतीसाठी 15 बेस पॉईंटने कमी केले होते.
१० जानेवारी २०२० पासून एसबीआयच्या एक वर्षांच्या एफडीवर व्याज दर ६.१० टक्के होते. तर नोव्हेंबर २०१९ पासून व्याज दर ६.२५ टक्के होते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वर्षाच्या एफडीवर व्याज दर ६.६० टक्के होते तर नोव्हेंबर २०१९ ला व्याज दर ६.७५ टक्के होते. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये सामान्य लोकांसाठी एफडी व्याज दर ६.८ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.३ टक्के होते.
ज्येष्ठ नागरिकांवर होणार परिणाम
मुदत ठेव व्याजदराच्या कपातचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांना होतो. एफडी हा ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नाचा एक चांगला मार्ग आहे. एफडी व्याजदरात घट झाल्याने टर्म डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिसमधील ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या छोट्या बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगला पर्याय असू शकतात.
२०१९ – २० मध्ये ५ टक्के राहण्याचा अंदाज
रिझर्व बँकने आर्थिक वृद्धी दर २०१९-२० मध्ये ५ टक्के ठेवण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की आर्थिक वृद्धी दर २०२०-२१ मध्ये सुधारुन ६ टक्के होती. त्यांचे म्हणणे आहे की आर्थिक वृद्धी दर अद्याप देखील आपल्या संभावित क्षमतेपेक्षा कमी आहे.