नवी दिल्ली :वृत्तसंस्था – RBI Decision Dry ATMs | ‘ड्राय एटीएम’ विरूद्ध रिझर्व्ह बँकेने मोठी घोषणा केली आहे. ड्राय एटीएमचा अर्थ हा आहे की, ज्यातील पैसे संपले आहेत. रिझर्व्ह बँकेने ड्राय एटीएमबाबत मोठा निर्णय घेतला आहे (RBI has taken a big decision regarding dry ATMs). आरबीआयने म्हटले आहे की, ज्या बँकेचे असे एटीएम असेल, त्या बँकेला 10,000 रुपयांचा दंड (Rs 10,000 fine) केला जाईल. या स्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर (Twitter) किंवा फेसबुक (Facebook) पेजसह फोन नंबर 011 23711333 वर फोन करू शकतात.
डब्ल्यूएलएओ कंपन्यांना सुद्धा चाप
बँकांशिवाय व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशन (WLAO) साठी सुद्धा रिझर्व्ह बँकेने नियम जारी केला आहे. डब्ल्यूएलएओ कंपन्यांद्वारे वेगवेगळ्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकतात.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकांना याकडे लक्ष ठेवावे लागेल की, एटीएममधील पैसे संपू नये. जी बँक या नियमाचे पालन करणार नाही तिला दंड केला जाईल. हा दंड 10,000 असेल. हा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पैसे मिळाले नाहीत तरच तक्रार करता येईल
दंडाची तरतूद तेव्हा लागू होईल जेव्हा एखादा कस्टमर एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाईल आणि त्यास रक्कम मिळणार नाही. अशा स्थितीत कस्टमर रिझर्व्ह बँकेला थेट तक्रार करू शकतो.
महिन्याला 10 तासांची सूट
नियमात ठरवले आहे की, एक महिन्यात एखाद्या एटीएममध्ये 10 तासापेक्षा जास्त वेळपर्यंत कॅशची कमतरता असू नये. यापेक्षा वेळ वाढली तर बँकेला दहा हजार दंड होईल. WLAO च्या केसमध्ये सुद्धा बँकेला दंड लागेल. बँकेला ठरवावे लागेल की ते डब्ल्यूएलएओकडून किती आणि केव्हा दंड वसूल करणार आहेत.
काय आहे नवीन नियम (What is New Dry ATM Rules)
– रिझर्व्ह बँकेच्या रिजनल ऑफिसच्या इश्यू डिपार्टमेंटकडून बँकेला दंड केला जाईल.
– यासाठी कम्पीटंट अथॉरिटी म्हणून रिजनल ऑफिसच्या इश्यू डिपार्टमेंटच्या ऑफिसर इनचार्जला अधिकृत केले आहे.
– याच अधिकार्याच्या कार्यक्षेत्रात हे एटीएम येतील ज्यांच्यावर कॅशबाबत देखरेख केली जाईल.
– जर एखाद्या बँक किंवा WLAO ला दंडाविरूद्ध अपील करायचे असेल तर रिजनल ऑफिसचे रिजनल डायरेक्टर किंवा ऑफिसर इन्चार्जशी संपर्क करावा लागेल. यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे.
– दंड लागल्याच्या तारखेपासून 30 दिवस मोजण्यात येतील.
– रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय ग्राहक सेवा आणि समाधानासाठी आहे, यासाठी दंडाविरूद्ध केलेल्या अपीलात योग्य आणि चुकीच्या कारणाचा शोध घेतला जाईल.
– कारण योग्य आढळल्यास अपीलावर कारवाई सुरू केली जाईल.
web title: RBI Decision Dry ATMs | If you do not receive cash at the ATM, call ‘this’ number, RBI will charge a penalty of Rs 10,000 from the concerned bank; Find out.
Rain in Maharashtra | आगामी 3 ते 4 तासात मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
Pune Crime | माहेराहून 100 तोळे सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ; आशिष ढोणेसह 6 जणांवर FIR