पुणे: Ravindra Dhangekar | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Car Accident Pune) पोलिसांच्या कारवाईचा वेग वाढवण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकरांची भूमिका महत्वाची ठरली. या अपघात प्रकरणात आरोपी मुलाला काही तासात जामीन मिळाल्यांनतर आमदार धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
पोलीस (Pune Police) पैसे खाऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे ससून रुग्णालयापर्यंत पोहोचले. डॉक्टरांनी पैसे खाऊन मुलाच्या रक्ताच्या नमुना अहवालात फेरफार (blood Sample Tampering Case) केल्याचे पोलिसांच्या तपासात सिद्ध झाल्यानंतर दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान आमदार धंगेकर यांनी यावरून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर गंभीर आरोप केले. कोल्हापूर (Kolhapur) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलतानाही आमदार धंगेकर यांनी सरकारवर निशाणा साधला. “मी ४ तारखेनंतर विधानसभेत नसेन, पुणेकर आहे, कोणाला घाबरत नाही” असे म्हणत हसन मुश्रीफांच्या मानहानी दाव्याच्या वक्त्यव्यावरून पलटवार केला.
या पत्रकार परिषदेत पुण्यातील अपघात प्रकरणावर विचारले असता ते म्हणाले,” पैसे टाकून सिस्टीम विकत घेऊ शकतो, ही त्या श्रीमंतांची भूमिका होती. आम्ही मंत्र्यांवर टीका केल्यानंतर त्यांना माझा राग आला. मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो, पण पुण्यातील पब संस्कृती (Pub Sanskruti) बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, नोटीस द्या नाहीतर, आणखी काही करा.
ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी मला धमकी देऊ नये. धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही. मी पुणेकर आहे, घाबरणार नाही, असे रवींद्र धंगेकरांनी यावेळी ठणकावून सांगितले.