नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेशन कार्ड (Ration card) सध्या खुप महत्वाच्या डॉक्यूमेंट (Important Documents) पैकी एक आहे. रेशन कार्डद्वारे सरकार राज्यातील गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. रेशन कार्डचा वापर अनेक ठिकाणी आयडी प्रूफ (Id Proof) म्हणून केला जातो. कुणीही भारतीय नागरिक यासाठी अप्लाय करू शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची नावे आपल्या वडिलांच्या कार्डमध्ये नोंदली जातात. तर 18 पेक्षा जास्त वय असलेले रेशन कार्डसाठी (Ration card) अप्लाय करू शकतात. रेशन कार्ड बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. याबाबत जाणून घेवूयात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
असा करा अर्ज
1. रेशन कार्डसाठीचा अर्ज जवळच्या पुरवठा कार्यालयातून घेऊ शकता. किंवा अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक विभागाच्या वेबसाइटवर अथवा राज्याच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.
2. तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याच्या वेबसाइटवर अर्ज करू शकता.
3. रेशन कार्ड 2 प्रकारची असतात. पहिले, गरीबी रेषेच्या खालील लोकांसाठी आणि दुसरे गरीबी रेषेच्या वरील लोकांसाठी. तुम्ही ज्या श्रेणीत येता, त्याच आधारावर रेशन कार्ड बनवू शकता. https://nfsa.gov.in/portal/apply_ration_card च्या वेबसाइटवर जाऊन रेशन कार्ड बनवू शकता.
4. रेशन कार्डसाठी माहिती भरा. आवश्यक डॉक्युमेंट्स जोडा.
5 आवश्यक अर्ज शुल्क भरा. बीपीएल / एएई कार्डसाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल.
6. हा अर्ज जवळच्या कार्यालयात जमा करा. 15 दिवसानंतर रेशन कार्ड घरी येईल.
रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
मतदान कार्ड / मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, अॅड्रेस प्रुफ, कुटुंब प्रमुखाचे 2 पासपोर्ट साइज फोटो, वीज/पाण्याचे बिल/टेलीफोन बिल (कोणतेही एक), भारत सरकार द्वारे जारी कोणतेही कागदपत्र जर असेल.
Web Title : ration card how to apply for ration card check step by step process details here
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus | कोरोनापासून बचाव करायचा आहे का ? शरीरात होऊ देऊ नका ‘या’ 4 व्हिटॅमिनची कमतरता