नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभेत हरियाणासोबतच देशभरात NDA प्रणित भाजपला घवघवीत यश मिळाले मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रोज नवनवीन घोटाळे समोर येत असताना सरकार यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. त्यातच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षा व सरकारी भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. या भरतीत मोठ्या प्रमाणात विसंगती आहेत. यामुळे सर्व भरती झालेल्या उमेदवारांच्या गुणांची तपासणी झाली पाहिजे आणि निकाल सार्वजनिकरित्या जाहीर केला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे ते म्हणतात कि, हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि भ्रष्टाचार वाढला आहे. रोज नवनवीन घोटाळे समोर येत असताना सरकार यावर कोणतेही प्रतिकिया देत नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना याचा फटका बसत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.
सध्याची परिस्थिती पाहता हरियाणामधील युवकांचे भविष्य अंधारात आहे. भाजप सरकार खरे असेल तर त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २२ मे २०१४ च्या निकालानुसार लेखी परीक्षेत आणि मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे गुण सार्वजनिकरित्या जाहीर केले पाहिजेत अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भर्तीत झालेल्या घोटाळ्यावरून चौकशी करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हरियाणा के युवाओं का भविष्य हुआ अंधकार,
सरकारी नौकरियों में धांधलियों का लगा अंबार !
पिछले पाँच साल में हरियाणा में हुई सभी भर्तियों के सारे उम्मीदवारों के लिखित परीक्षाओं और इंटरव्यू के नम्बर सार्वजनिक किए जांए।
मेरा बयान:- pic.twitter.com/5TU164qCBs
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 9, 2019