नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नाच्या पाच वर्षानंतर मेहुण्याने १२ वीमध्ये शिकणाऱ्या आपल्याच मेहुणीवर बलात्कार केला आहे. तीन वेळा धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला असून आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित मुलगी जवळच्याच गावात राहत असून ती १२ वीला आहे. तिच्या बहिणीच्या लग्नाला पाच वर्षे झाली असून मागील काही काळापासून तिचा मेहुणा तिच्या मागे फिरायचा गमती-गमतीत तिला चुकीच्या प्रकारे पकडायचा. आठवड्यापूर्वी एकदा घरी कोणी नसताना तो घरी आला आणि त्याने वेळेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला धमकावले.
घटना घडल्यानंतर पीडित मुलगी घाबरली असल्यामुळे गप्प राहिली. एका दिवशी जेव्हा पीडिता शाळेतून सुटली तेव्हा तिचा मेहुणा बाहेरच उभा होता. त्याला घरी कोणी नाही हे माहित होते. त्याने तिला भीती दाखवत तिच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिने मेहुण्याला धडा शिकवायचे ठरवले आणि पोलीस हेल्पलाइन नंबर ११२ डायल करून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर महिला पोलीस इन्स्पेक्टर राजविंदर कौर यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिची तक्रार नोंदवून घेतली.
बलात्कार आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत मेहुण्याला अटक केले. घटनेची माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यात आले असून त्याने आपल्या मेहुणीवर बलात्कार केल्याची कबुलीही दिली आहे. मादक पदार्थांचे व्यसन असलेल्या आरोपीने लग्नाच्या काहीच वर्षानंतरही एका मुलीवर बलात्कार केल्याबद्दल तुरूंगावास भोगला आहे. तसेच त्या प्रकरणात तो आता जामिनावर बाहेर आला होता, असे ते म्हणाले.