राजस्थान : वृत्तसंस्था – दौसा लालसोटमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ३ आरोपींनी या मुलीचे अपहरण करून जवळपास ६ तास कार रस्त्यावर पळवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी आरोपींनी पीडितचे डोळे बांधले होते. बलात्कारानंतर आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी देत रस्त्यावर सोडून दिले. रामलखन, मोहित आणि लालाराम अशी या आरोपींची नावे असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विद्यार्थिनी पहाटे पाच वाजता तिच्या गावातून कोचिंगसाठी गेली होती. होदायली वळणावर तीन तरुण कारमधून आले आणि विद्यार्थिनीला ओढून गाडीत बसवले, आरोपीने ओळख पटवू नये म्हणून तिचा स्कार्फ मुलीच्या डोळ्यावर बांधला. त्यानंतर, तरूणांनी बरीच किलोमीटर पीडितेला गाडीतच धरुन ठेवून तिच्यावर बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, लालसोट शहरातील गंगापूर रोडवर सुमारे सहा तास तिघा आरोपींनी पीडित मुलीवर बलात्कार केला.आरोपींनी पीडितेला घडलेला प्रकरणाची कोणाला माहिती न देता जीवे मारण्याची धमकी देत रस्त्यावर सोडून दिले. घाबरलेली मुलगी घरी पोहोचली आणि घरातील सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित विद्याथीनीने तिन्ही आरोपींवर लालसोट पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
Visit : bahujannama.com