बिजनौर : वृत्तसंस्था – Rape Case |मुंबईतील साकीनाका (Mumbai Rape Case) परिसरात महिलेवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) देखील एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या महिला खेळाडूने राष्ट्रीय स्तरावर खो-खो स्पर्धा खेळली होती. या महिला खेळाडूचा मृतदेह बिजनौर रेल्वे स्थानकाजवळ (Bijnor Railway Station) रेल्वे ट्रॅकवर (railway track) मृतदेह सापडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा (FIR) नोंद केला असून तपास सुरु केला आहे.
बिजनौरची ही 24 वर्षीय खेळाडू शुक्रवारी (दि.10) दुपारी आपल्या घरातून एका कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूसाठी (Interview in college) निघाली होती.
मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.
तेवढ्यात एका शेजारच्या महिलेने रेल्वे ट्रॅकवर एका रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा मृतदेह पडलेला सापडल्याचे सांगितले. यामुळे घरच्यांनी पोलिसांना खबर दिली. काही तासांनी तिची ओळख पटली.
तरुणीच्या घरच्यांना समजण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी पोहचले होते.
घरापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनच्या गोदामाच्या (warehouse) मागे तिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.
तिच्या शरीरावरील घाव पाहून असे दिसते की तिच्यावर बळजबरी करण्यात आली. तिच्या गळ्यात ओढणी आवळलेली होती. तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले.
तिच्या शरीरावर जखमादेखील होत्या. तिचा एक दातही तुटला आहे.
नाकातून रक्त येत होते, असे तिच्या बहीणीने सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मृत खेळाडू ही 2016 मध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) झालेल्या खो-खो स्पर्धेत खेळली होती. तसेच युनिव्हर्सिटीमध्ये (University) देखील तीने स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा कोणी नोंदवयाचा यावरुन रेल्वे पोलीस (Railway Police) आणि राज्याचे पोलीस यांच्यात वाद होत होता. अखेर राज्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन रेल्वे स्टेशन भागातील नशेबाज लोकांवर संशय व्यक्त केला आहे.
Web Title : Rape Case | rape on player who played kho kho maharashtra body found ups bijnor.
Rain in Maharashtra | मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात ‘कोसळधार’ पावसाचा इशारा