बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवूड सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे (Ranbir Kapoor) पाहिले जाते. रणबीरने आज त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल जरी करू शकला नसला तरी ‘ब्रह्मास्त्रने’ मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ब्रह्मास्त्र मध्ये आलिया आणि रणबीरच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ब्रह्मास्त्र सुपरहिट झाल्यानंतर काही महिन्यातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आता नुकताच त्याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटातील लूक देखील समोर आले आहे. या सर्व गोष्टींमुळे रणबीर खूपच चर्चेत होता. तर आता पहिल्यांदाच रणबीर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर एकत्र दिसणार आहेत. ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने रणबीर एका कार्यक्रमात असताना एका चाहतीने केलेल्या कृत्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रणबीरचा चाहता वर्ग फारच मोठा आहे. सोशल मीडियावर रणबीर जरी सक्रिय नसला तरी त्याचा चाहता वर्ग मात्र प्रचंड सक्रिय असतो. ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर एका कॉलेजमध्ये गेला होता. त्यावेळी तो स्टेजवर असतानाच एक चाहती धावत आली आणि त्याला थेट मिठी मारली. तेथे असलेल्या सुरक्षारक्षकांनी लगेच रणबीरची सुटका केली. मात्र यावेळी रणबीर ने सुरक्षा रक्षकाला बाजूला सारत त्या चहातीला मिठी मारली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर अनेकांनी रणबीरचे कौतुकही केले आहे. या व्हिडिओवर सध्या कमेंट्स वर्षाव होताना दिसत आहे.
व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर कमेंट केले आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले की,
“रणबीरच्या (Ranbir Kapoor) जागी दुसरा कोणी अभिनेता असला असता तर त्याने सुरक्षारक्षकाकडून
स्वतःची सुटका करून घेतली असती मात्र रणबीरने त्या मुलीला मिठी मारत तिला भेटण्याची संधी दिली”.
तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, “मला तुझ्याबद्दल आदर आहे कारण तू खूपच नम्र आहे”. तर आणखीन एका
युजरने लिहिले, “तो खूप नम्र सुपस्टार आहे”.
तर एका चाहतीने “माझा नंबर कधी येणार” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रणबीरच्या या व्हिडिओवर एक ना अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
तर रणबीर आणि श्रद्धाचा हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.
तर चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ranbir Kapoor | during promotion of film tu jhooti main makkar lady fan hug actor ranbir kapoor
हे देखील वाचा :
Pune Accident News | दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने ज्येष्ठाचा मृत्यु
Pune Crime News | भावाच्या पत्नीला सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात वीट घालून केले जबर जखमी