नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेरा प्रमुख राम रहीमला उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. राम रहीमची पत्नी हरजीत कौर यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. राम रहीमला पॅरोल देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असून याचिकेमध्ये राम रहीमच्या आईला आजारी असल्याचे नमूद केले आहे. याचिका फेटाळत कोर्टाने सांगितले कि, ‘तुमच्या मुलांचे इतके मोठे रुग्णालय आहे, तुमच्या आईला तिथेच उपचार द्या. बाकीचे कुटुंब एकत्र आहेच की.’
राम राहीन यांच्या पत्नीने कोणत्या अर्थाने हि याची दाखल केली? तसेच राम रहीम यांनी स्वतः याचिका का नाही दाखल केली? असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहेत. दरम्यान राम रहीम यांची आई दिल्ली येथील बत्रा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, सोमवारी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची मानलेली मुलगी हनीप्रीत यांना देखील पंजाब – हरियाणा कोर्टाकडून निराशा हाती आली. सोमवारी या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. तेव्हा न्यायमूर्ती सुरेंद्र गुप्ता यांनी फाईल पाहिल्याबद्दल खटला ऐकण्यास नकार दिला. हे प्रकरण दुसर्या खंडपीठाकडे दिल्याबद्दल त्यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवले.
हनीप्रीतच्या वकिलांनी त्यांना बाजू मांडून द्यायला हवी होती असे सांगितले. त्या नंतर कारवाई सुरु होणार होती, परंतु न्यायमूर्तीनी कारवाई सुरु करण्यास नकार दिला .