बहुजननामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तेपदी आमदार राम कदम आणि अवधूत वाघ यांची प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता.२२) काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. यात भाजपच्या प्रदेश सचिवपदी राजेश पांडे, प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्क्षपदी एजाज देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्यातील इतर पदासांठी नेमणूकाही त्यांनी यावेळी केल्या आहेत.
यात नागपूरचे महेशकुमार कुकरेजा प्रदेश व्यापारी आघाडी संयोजकपदी, गणेश ताठे प्रदेश कामगार आघाडी संयोजकपदी, उदय पटवर्धन रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच शिरीष बोराळकर औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख, मकरंद देशपांडे यांची पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख, राजेश पांडे यांची पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ सहनोंदणी प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तर ओमप्रकाश चौहान, श्याम सप्रे आणि सौमेन मुखर्जी यांची माध्यम सहसंपर्क प्रमुखपदी चंद्रकांत पाटील यांनी नियुक्या केल्या आहेत.