बीड : बहुजननामा ऑनलाइन – येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मैदानावर आज ३१ जानेवारी रोजी संत सावता माळी समाजाच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे या मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे राहणार आहेत.
मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. भीमराव धोंडे (बीड), आ. अतुल सावे (औरंगाबाद ), आ. जयकुमार गोरे (सातारा), आ. योगेश टिळेकर (पुणे), आ. मनिषा चौधरी (मुंबई) आ. देवयानी फरांदे (नाशिक), कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्यासह भास्कर आंबेकर, शंकर बोरकर, दिलीप थोरात, सुहास सिरसाट, तुषार वैद्य, बाळासाहेब माळी, रामप्रसाद थोरात, बाबुराव दुधाळ,सुशिल जवंजाळ, राजेंद्र गिरमे, संजय साडेगावकर, रंगनाथ धोंडे, आसाराम तळेकर, अजिनाथ हजारे आदींंची उपस्थिती राहणार आहे. तसेच सावता महाराजांचे वंशज श्री रमेश महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष रामजी गाढवे,कैलास माळोदे, प्रल्हाद गाढवे ,केशव गाढवे, अनिरुद्ध गाढवे, प्रशांत काळे आदींनी केले आहे.