Rajguru Nagar Pune Crime News | पुणे : गरबा डान्सचे प्रशिक्षण देणाऱ्या सुप्रसिद्ध आर्टिस्ट अशोक माळीचा हार्ट अटॅकने मृत्यू (Video)

पुणे : Rajguru Nagar Pune Crime News | पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील स्वराज्य मित्र मंडळाच्या गरबा डान्स शिक्षण देणा-या सुप्रसिद्ध आर्टिस्टचा मुलासोबत गरबा खेळताना दुदैवी मृत्यु झाला.
अशोक माळी हा तरुण मुळचा धुळे जिल्ह्यातील असुन चाकण येथे वास्तव्यास असुन रात्री राजगुरुनगर शहरातील नवरात्र उत्सवातील मंडळांना गरबा कसा खेळला जावा यासाठी स्वत चिमुकल्या मुलासोबत येऊन प्रशिक्षण देत असताना अचानक खाली कोसळला यावेळी स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशोक माळी यांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केलंय त्यामुळे गरब्याचे प्रशिक्षण देणा-या गरबा डान्सरचा गरबा खेळतानाचा दुदैवी मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.