Rajesh Shah | भारतीय उद्योग व्यापार मंडळाच्या उपाध्यक्ष पदी राजेश शहा

July 30, 2024

पुणे : Rajesh Shah | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि दि पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा यांची भारतीय उद्योग व्यापार मंडळाच्या उपाध्यक्ष निवड करण्यात आली आहे. ही निवड वरिष्ठ कार्यकारणीने बिनविरोध केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बाबुलाल राष्ट्रीय वरिष्ठ महामंत्री मुकुंद गुप्ता यांनी शहा यांना निवडीचे पत्र दिले आहे.

राजेश शहा हे एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे, दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच श्री पूना गुजराती बंधू समाजचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. तर पूना हॉस्पिटल, जनसेवा फॉऊंडेशन, विवेकानंद इन्स्टिटयूट इत्यादी संस्थांच्या विविध पदांवर कार्यरत आहेत.