अलवर : वृत्तसंस्था – राजस्थानचा अलवर जिल्हा मॉब लिंचिंगसाठी देश – परदेशात बदनाम झाला आहे. परंतु आता येथीलच 21 वर्षांचा तरूण शुभम यादवने सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरमूधन इस्लामिक स्टडीजच्या प्रवेश परीक्षेत टॉप रँक मिळवून देशात वेगळा आदर्श मांडला आहे. शुभम देशातील पहिला काश्मीरी नसलेला आणि मुस्लिम नसलेला तरूण आहे, ज्याने हे यश मिळवले आहे. शुभम सध्या दिल्ली युनिव्हर्सिटीतून एलएलबीचा अभ्यास करत आहे. पुढे तो सिव्हील सेवेमध्ये जाण्यास इच्छूक आहे.
शुभमने सांगितले की, त्यास जगभरातील वाढता इस्लामोफोबिया आणि धार्मिक ध्रुवीकरण पाहून इस्लामबाबत जाणण्याची उत्सुकता निर्माण झाली. मित्रांनी सुद्धा याच्यासाठी प्रेरित केले.
शुभम म्हणतो, सध्याच्या वातावरणात एकमेंकांना समजणे आणि सामंज्यस्य बाळगणे खुप महत्वपूर्ण आहे. दुर्दैव्य म्हणजे इस्लाम आणि इस्लामी अभ्यासांमध्ये खुप जास्त रूढीवाद आहे. इस्लामी अभ्यास केवळ मुस्लिमांबाबत नव्हे, तर इस्लामी कायदा आणि संस्कृतीचे संशोधन आहे.
मागील 29 ऑक्टोबरला सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरमध्ये इस्लामिक स्टडीजमध्ये मास्टर कोर्ससाठी आखिल भारतीय प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत अरवलचा शुभम यादवने टॉप केले आहे. शुभमने दर्शन शास्त्रातून पदवीची डिग्री मिळवली आहे आणि डीयूमधून एलएलबीचा अभ्यासात करत आहे. सध्या रिझल्टची प्रतिक्षा करत आहे.
शुभमचे वडिल प्रदीप यादव अलवरमध्ये किराणा दुकान चालवतात, तर आई इंदुबाला इतिहासाच्या शिक्षिका आहेत. शुभमचे प्राधान्य दिल्ली विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास पूर्ण करण्यात आहे.