मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. हैदराबाद एन्काऊंटरने संपूर्ण देश ढवळून निघाला असून अनेक क्षेत्रातील जेष्ठ लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. याबद्दल सरकार व पोलिसांचे अनेकांनी अभिनंदन केले. खरंतर चार दिवसांपूर्वी जेव्हा हैदाराबादमधून आरोपींना पोलिस घेऊन जात होते, त्यावेळी पोलिसांबद्दल आक्रोश होता. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रया दिली आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चारही आरोपींच्या एन्काऊंटरचं समर्थन केलं आहे.
कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. #Hyderabad #Encounter #JusticeForDisha
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019
हैदराबाद सामूहिक बलात्काराचे चार आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाले आहेत. ही चकमक राष्ट्रीय महामार्ग -४४ जवळ घडली. आरोपींचे मृतदेह एकमेकांपासून थोड्याच अंतरावर होते. या एन्काऊंटरनंतर हैदराबाद पोलिसांचं चहूबाजूंनी कौतुक होत आहेत. हैदराबादमध्ये लोक फुलांचा वर्षाव करत आहेत. एन्काऊंटरची माहिती मिळताच लोक घटनास्थळी पोहोचले. आता परिस्थिती अशी आहे की लोक पोलिसांना खांद्यावर उचलून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. दरम्यान या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. तसंच इनकॅमेरा पोस्टमार्टम होणार असल्याचीही माहिती मिळते.