पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशात महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यसाठी गर्दी आणि मास्कचा वापर करणं हाच एक उत्तम उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मास्क न घालताच अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे दिसून आले. एका कार्यक्रमात त्यांनी ‘मी मास्क घातलच नाही’, असे म्हटले होते. मात्र, पुणे दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चक्क मास्क (mask) घातल्याचे पहायला मिळाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आगामी पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महानगरापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेकांच्या गाठी-भेटी घेतली. याच दरम्यान त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांची आज भेट घेतली. ठाकरे आणि पुरंदरे यांच्यामध्ये कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. आजच्या भेटीत एक विशेष गोष्ट म्हणजे, राज ठाकरे यांनी मास्क लावला होता.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मास्क न लावल्यामुळे ते चर्चेत आले होते.
पण सगळ्यांनी मास्क लावला होता. म्हणून मी लावला नाही,
अस राज ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते.
परंतु आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेताना त्यांनी मास्क लावल्याचे दिसून आले.
राज ठाकरे हे पुण्यात आल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत असतात.
Web Title :- Raj Thackeray | Raj Thackeray wear mask today in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 276 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
PM Kisan | कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये, नववा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार