मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज ठाकरे (Raj Thackeray) २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान कोकण आणि कोल्हापूरचा दौरा करणार असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे. साधारणपणे आठ दिवसांचा त्यांचा दौरा असेल. मंगळवारी राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईहून कोल्हापूरला निघतील. तिथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतील. बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेऊन सावंतवाडीला जातील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
२९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ ह्या दरम्यान राजसाहेब कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे. pic.twitter.com/26zNqOsqae
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 24, 2022
त्यांचा संपूर्ण दौरा पक्षाच्या बांधणीसाठी समर्पित केलेला दिसून येते. दौऱ्यात ते असंख्य पदाधिकऱ्यांना भेटतील, काही ठिकाणी नवीन कार्यालयाचे उदघाटन करतील.
काही नवीन कार्यकर्त्याच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहतील. राज ठाकरेंचा हा दौरा ६ डिसेंबरला दापोलीत संपणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी आताच कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
त्यांना याचा कितपत फायदा होतो हे पाहणे लक्षणीय ठरेल.
Web Title :- Raj Thackeray | Raj Thackeray to visit Kolhapur, Sindhudurg and Ratnagiri; MNS announced the details
हे देखील वाचा :
Shailesh Lodha | शैलेश लोढा यांनी फोटो शेअर करत विकी कौशलसाठी लिहिली खास पोस्ट
Ved Teaser | रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर रिलीज