मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Raj Thackeray |आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं हातात घेतलीत, आपल खरोखर अभिनंदन, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या दु:खावर फुंकर मारली आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत त्यांच्यासाठी पत्रही लिहिले आहे. तुम्ही घालून दिलेला वस्तुपाठ देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखा आहे, असंही राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हटले पत्रात?
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपने मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…
तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली. पक्ष पक्षाचाआदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील (Political Party) आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन! (MNS Chief Raj Thackeray)
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022
आता जरा आपल्यासाठी –
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते.
ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे…
एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे (Maharashtra) सिद्ध केलेलंच आहे.
त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!
आपला मित्र
राज ठाकरे
Web Title :- Raj Thackeray | mns chief raj thackeray letter to maharashtra depuyt cm devendra faadnvis over new government oath ceremony
हे देखील वाचा :
Pune Minor Girl Rape Case | बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
Atul Bhatkhalkar | ‘सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही’, भाजपची टीका
Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार