पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोकणाला झोडपून काढलेल्या पावसाचा (Rain Rest) जोर आता कमी झाला आहे. आगामी 2 दिवस कोठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने कोठेही अलर्ट alert weather department दिला नाही. मात्र 2 दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर(Chandrapur), भंडारा(bhandara),गडचिरोली(Gadchiroli) , गोंदिया(Gondia), नागपूर(nagpur) आदी 5 जिल्ह्यात दि. 23 आणि 24 जून रोजी मेगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.
गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस Heavy Rain झाला असून मराठवाड्या(marathwada)त तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
रविवार सकाळपर्यंत कोकणातील पेडणे 190, माथेरान 120, सावंतवाडी 100, दोडामार्ग, मंडणगड 90, केपे, सुधागड, पाली, वैभववाडी, वाल्पोई 80 मिमी पावसाची नोंद झाली होती.
तसेच सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा 110 चांदगड, लोणावळा, महाबळेश्वर 90 राधानगरी,
त्र्यंबकेश्वर 60, आजारा, गारगोटी, हर्सूल, पन्हाळा, शाहूवाडी 50, वडगाव मावळ 40 मिमी पाऊस झाला. याबरोबरच काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
मराठवाड्यातील आष्टी, गंगाखेड, हिंगोली, परंडा, वाशी 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भातील गोरेगाव, तिरोरा 20, देवरी, लाखनी, मोर्सी, तुमसर 10 मिमी पाऊस पडला.
घाटमाथ्यावरील कोयना (नवजा) 170, अम्बोणे 100 कोयना, (पोफळी), शिरगाव 70
खोपोली, वळवण 60, ताम्हिणी, डुंगरवाडी 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी दिवसभरात कोल्हापूर, महाबळेश्वर, मुंबई, Mumbai सांताक्रूझ, पणजी,
डहाणु, पुणे, Pune ब्रम्हपूरी, वर्धा येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
Web Titel : rain rest next two days state no alert weather department
Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत