Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस कोसळणार; 11 जिल्ह्यांना Alert

Rain in Maharashtra rain in vidarbha for next 4 days imd give alerts to 11 district in maharashtra

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Rain in Maharashtra | मागील आठवड्यापूर्वी पावसाने (Rain) राज्यात रिपरिप केली होती. तर, आठवड्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली. सात दिवस पाऊस गायब झाल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र दरम्यानच्या काळात पूर्व विदर्भात (East Vidarbha) काही भागात पाऊस झाला आहे. यांनतर आता पुन्हा महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) पावसासाठी हवामान पोषक व्हायला सुरुवात झालीय. यामुळे आगामी 4 दिवस (Four days) पूर्व विदर्भासह राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने (Weather department) वर्तवली आहे. आगामी 4 दिवस राज्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या झोतात मुसळधार पाऊस बरसणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागामध्ये आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. म्हणून पूर्व विदर्भासह राज्यातील काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. आज (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्रासह (Rain in Maharashtra) विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार (Rain) आहेत. आज बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली अशा 11 जिल्ह्यांत हवामान खात्याकडून (Weather department) येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, आकाशात मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहेत.
त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा तसेच मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला दिला आहे.
आजपासून तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात देखील पाऊस (Rain) बरसणार आहे.
रविवारी (29 ऑगस्ट) रोजी या दिलेल्या 11 जिल्ह्यांसह उस्मानाबाद आणि लातूर या 2 जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळणार आहे.
याचबरोबर सोमवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस बरसणार आहे.

Web Title : Rain in Maharashtra | rain in vidarbha for next 4 days imd give alerts to 11 district in maharashtra

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Nitin Landge Bribe Case | ‘त्या’ 16 जणांची चौकशी होत नाही तोपर्यंत आरोपींना जामीन देवू नये ! जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला, जाणून घ्या