Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट

 Rain In Maharashtra | maharashtra rain alert heavy rain in solapur satara kolhapur and konkan weather report today

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Rain In Maharashtra | संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने हैराण केले आहे. दिवाळी आली तरी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य देखील हवालदिल आहेत. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार परतीचा पाऊस आता ओसरणार असून दिवाळीत पावसाचे (Rain In Maharashtra) संकट टळणार आहे. मात्र काही भागांत पावसाचा मुक्काम राहणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे (Meteorologist Ramchandra Sable) यांनी म्हटले आहे की, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 10 मिमी पाऊसाची शक्यता आहे. तसेच, इतर भागांत पाऊस (Rain) निरोप घेईल. पावसाचा मुक्काम वाढल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे.

 

सायंकाळी पाऊस (Rain In Maharashtra) पडत असल्याने त्याचा दिवाळी खरेदीवर परिणाम होत आहे. यामुळे व्यापारी देखील हवालदिल होत आहेत. येत्या दोन दिवसात परतीचा पाऊस ओसरायला सुरवात होईल. परतुं राज्यातील काही भागात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याने काही नागरिकांना पावसातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

 

सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी परतीचा पाऊस अजून दोन ते तीन दिवस राहणार आहे.
तर इतर ठिकाणी परतीचा पाऊस ओसरणार आहे. परतीचा पाऊस राज्यातून 25 ऑक्टोबर पासून निरोप घेणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Rain In Maharashtra | maharashtra rain alert heavy rain in solapur satara kolhapur and konkan weather report today

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच, यंदाची दिवाळी तुरुंगातच

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच, CBI न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

MP Navneet Rana | बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा अडचणीत, अटक होणार?