…म्हणून महाराष्ट्रात होतेय अतिवृष्टी, तज्ज्ञांनी केला महत्वपुर्ण खुलासा, जाणून घ्या
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने (Rain in Maharashtra) धुडगूस घातला आहे. मुंबईत तर वादळी वाऱ्यासह पावसाने दाणदाण केली आहे. मुंबईसह (mumbai), ठाणे (thane), कोल्हापूर (kolhapur), सिंधुदुर्ग (sidhudurg), रायगड (Raigad), पालघर (palghar) आणि रत्नागिरी (ratnagiri) जिल्हयामध्ये जोरदार पावसाने झोडपले आहे. या जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसाच्या परिस्थितीवरून दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) विविध ठिकाणी अतिवृष्टी होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं मत भारतीय हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.
सध्या अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. म्हणून गेले तीन दिवस मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. तर काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणात अतिवृष्टी झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे (Indian Meteorological Department) वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे. तसेच, दरवर्षीचा मान्सून हा आधीच्या मान्सूनपेक्षा (Monsoon) काहीतरी वेगळा असतो. यामध्ये अनेक छोटे-मोठे बदल झालेले असतात. दरवर्षी जून महिन्यात एवढा अधिक पाऊस होतं नाही. परंतु, यावर्षी महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालीय.
होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी राज्यातील पावसाच्या संतुलनाबाबत माहिती दिली आहे की, अरबी समुद्रात (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) काही बदल झाले की राज्यात पाऊस पडतो. अरबी समुद्रातील शाखा सक्रिय झाली की, मध्य महाराष्ट्रासह (Rain in Maharashtra) कोकणात पाऊस पडतो. तर बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय झाली की विदर्भात पाऊस पडतो. अरबी समुद्रात (Arabian Sea) पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याची तीव्रता, वेग वाढली की आद्रता वाढते. त्यामुळे मान्सून (Monsoon) सक्रिय होतो. तर अतिवृष्टी होण्यामागं मुख्य कारण म्हणजे हवामानात होणारे तीव्र बदल. मात्र, अतिवृष्टी होण्याचं आणि हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस कमी पडण्याचं प्रमाण कमी का होत आहे. हा बदल नेमका कशामुळे? यावर बारकाईनं अभ्यास सुरू आहे, अशी माहिती देखील हवामान खात्याचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे.
कृपया हे देखील वाचा:
Anil Parab ! पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, पण..
Kolhapur News । कोल्हापूर जिल्ह्यात 27 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार
Corona Vaccination | कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, जाणून घ्या
OBC Reservation | सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती
Comments are closed.