बहुजननामा ऑनलाईन – भुसावळ येथील पांडुरंग चित्रपटगृहाजवळील खान्देश हॉटेलमध्ये झालेल्या निर्घुण हत्तेच्या गुन्ह्यात पोलीसांनी एका तरुणाला अटक केली आहे. नीलेश चंद्रकांत ताकदे (वय-२६ ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विकास वासुदेव साबळे (वय ३२) या तरुणाची या घटनेत हत्त्या कऱण्यात आली आहे. विकास हा नेपानगर येथे रेल्वेत गँगमन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील खान्देश बिअर बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये विकास दारू पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी नीलेशही तेथे आला. या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून नीलेशने कटरने विकासच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. घडलेल्या प्रकाराबाबतत पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विकासला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याच्या मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान विकासचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय गुळींग करत आहेत. भुसावळात आठवडाभरातील चाकू हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी