बहुजननामा ऑनलाइन : गणपती उत्सव तरुणाई च थिरकत नेहमीचंच झाल आहे मात्र नंदूरबार मध्ये तर उत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रा मध्ये तर बारबाला नाचविण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरातील लोको पायलाट्स नि गणपतीची स्थापना केली आहे. शुक्रवारी (ता.६) रात्री गणेश मंडळांनी ऑर्केस्ट्रा चे आयोजन केले होते. यादरम्यान कार्यक्रम सुरू असताना अश्लिल गाणी सुरू झाल्यावर त्यावर बारबाला नाचू लागल्या.
त्यांना प्रतिसाद देत काही कर्मचारीही नाचू लागले. विशेष म्हणजे यावेळी रेल्वेचे लोको पायलट्स चे काही अधिकारीही होते. त्यानीही यावर काही आक्षेप घेतला नाही.