बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : रेल टेल मिनी रत्न (कॅटेगरी-1) श्रेणीची सरकारी कंपनी आहे. सरकारी कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा आयपीओ 16 फेब्रुवारीला खुला होईल. गुंतवणुकदार या आयपीओमध्ये 18 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करू शकतील. या आयपीओ अंतर्गत 8,71,53,369 शेयर ऑफर फॉर सेलच्या द्वारे विकले जातील. या आयपीओची लॉट साईज 155 इक्विटी शेयर्सची आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयपीओची प्राईस बँड 93-94 रुपये ठरवली आहे. सरकार या आयपीओतून सुमारे 819 कोटी रुपये जमवणार आहे. या आयपीओद्वारे मिळणारी रक्कम सरकारकडे जाईल. आयपीओ अँकर गुंतवणुकदारांसाठी 15 फेब्रुवारीला खुला होईल.
कंपनीने एका वक्तव्यात म्हटले आहे की, आयपीओद्वारे सरकार 87,153,369 इक्विटी शेयर्स सादर करत आहे, ज्याची भागीदारी 27.16 टक्के असेल. कंपनी देशभरात ब्रॉडबँड टेलीकॉम आणि मल्टी-मीडिया नेटवर्क पुरवते. यामध्ये 5 लाख इक्विटी शेयर कंपनीच्या कर्मचार्यांसाठी रिझर्व्ह आहेत.
रेल टेल इन्फॉर्मेशन अँड कम्यूनिकेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर पुरवते. ही भारताची सर्वात मोठी न्यूट्रल टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनी आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयडीबीआय कॅपिटल मार्केट अँड सिक्युरिटीज आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
रेल टेलची स्थापना सप्टेंबर 2000मध्ये करण्यात आली होती. याचा हेतू ट्रेनचे नियंत्रण संचालन, सुरक्षा आणि देशभरात ब्रॉडबँड आणि मल्टी मीडिया नेटवर्क सुविधा उपलब्ध करून अतिरिक्त उत्पन्न मिळवणे आहे.
रेल टेल कंपनीचा सर्वात मोठी व्यवसाय भारतीय रेल्वेसोबत आहे. संपूर्ण देशात रेल्वे ट्रॅकच्या कडेला ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम रेल टेलचे आहे. कंपनीचे डेटा सेंटर गुरुग्राम आणि तेलंगनाच्या सिकंदराबादमध्ये आहे. हा या वर्षीचा 6वा आयपीओ असेल.