बहुजननामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने सोलापूर, सातारा, रायगड(district superintendent of police )जिल्हयाच्या पोलीस अधिक्षकपदी आयपीएस अधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. काही दिवसांपुर्वी राज्यातील पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या मोठया प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या.(district superintendent of police )काही ठिकाणच्या बदल्या होणे अद्यापही बाकी आहे. त्यापैकी राज्य गृह विभागाने आज काही ठिकाणच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
बदली झालेल्या अधिकार्याचे नाव आणि त्यापुढे कोठुन कोठे बदली झाली याबाबत पुढील प्रमाणे
1. अशोक दुधे (प्रतिक्षाधीन ते पोलीस अधीक्षक, रायगड)
2. अजय कुमार बन्सल (प्रतिक्षाधीन ते पोलीस अधीक्षक सातारा)
3. श्रीमती तेजस्वी सातपुते (पोलीस अधीक्षक, सातारा ते पोलीस अधीक्षक, सोलापूर)
4. कुमार चिंथा (सहाय्यक पोलीस अधीक्षक / उपविभागीय अधिकारी अमळनेर उपविभाग, जळगाव ते सहाय्यक पोलीस अधीक्षक / उप विभागीय अधिकारी, जळगाव उपविभाग, जळगाव)
रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जळगाव उपविभागातील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.