रायगड : बहुजननामा ऑनलाइन – भरधाव पिकअप व्हॅनने दोन महिलांना चिरडले. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली( raigad-alibag-pen-highway-accident-1-passed-away-1-injured ) आहे. अलिबाग पेण रस्त्यावर वाडगाव गावाजवळ हा अपघात झाला आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी चालकाला पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले.
प्रेरणा प्रदीप पवार असे जागीच मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुशीला वसंत आग्रे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी प्रजापती (पुर्ण नाव, पत्ता समजू शकले नाही), या व्हॅनचालकास पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथे प्रेरणा पवार आणि सुशीला आग्रे या दोघी घरकाम करण्यासाठी नेहमी जात असत. नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून या दोघी चालत वाडगाव येथे आपल्या घरी येत होत्या. वाडगाव नजीक दोघी आल्या असता पेणकडून पिकअप व्हॅन (एमएच 06/ बीडब्लू 1653) हा चुकीच्या रस्त्याने आला आणि दोघींना उडविले. यात प्रेरणा पवार ही जागीच ठार झाली आहे. तर सुशीला ही जखमी होऊन पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी त्वरित रुग्णवाहिका बोलवून जखमी सुशीला हिला रुग्णालयात पाठवले. तर मयत प्रेरणा हीचा मृतदेह देखील रुग्णालयात पाठविला. चालक प्रजापती याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पिकअप व्हॅन ही भरधाव असल्याने चुकीच्या दिशेने येऊन एका घराच्या आणि झाडाच्यामध्ये अडकला आहे.अपघातात ठार झालेल्या प्रेरणा पवार यांना दोन जुळी मुले आणि एक मुलगा असे तीन मुले आहेत. तर पती, सासू सासरे असा परिवार आहे. या अपघातामुळे प्रेरणाची तिन्ही मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरवले आहे.