राहुरी : बहुजननामा ऑनलाइन – प्रीयसीच्या खुना ( murder ) नंतर त्याने दुसरे लग्न केले, दुसरीला दागिने देण्यासाठी सराफाचा खुन ( murder ) केला. या खुनाच्या धक्क्याने वृद्ध आजोबाचा मृत्यु झाला. भाच्याच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याने मामाने आत्महत्या केली. याला कारण घडले ते गावात तो मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी मामाकडे पाठविले होते. पण त्याची मुळ वृत्ती काही गेली नाही. एका आरोपीमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे पाहून पोलिसही चक्रावून गेले.
ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या गायकवाड (रा. शिरुर कासार, जि़ बीड) असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, ज्ञानेश्वर गायकवाड हा मुळचा शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील राहणारा. ज्ञानेश्वर हा गावातील मुलींची छेड काढत असल्याने घराच्यांनी वैतागून त्याला मामाकडे बीड तालुक्यातील शिरुर कासार येथे पाठविले.
तेथे असताना त्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिकच्या शीतल भामरे या विवाहितेशी ओळख झाली. शितल हिला दोन मुले आहेत.
तिचे ज्ञानेश्वरसोबत प्रेम जमल्याने सहा महिन्यांपूर्वी ती शिरुर कासारला आली.
ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहु लागले.
पण ज्ञानेश्वर तिच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला.
त्यावरुन त्यांच्या भांडणे होऊ लागली.
तेव्हा तिने आपल्याला पुन्हा नाशिकला सोडण्यास सांगितले.
ज्ञानेश्वरने नाशिकला जाताना मित्र केतन लोमटे याच्या मदतीने राहुरी फॅक्टरी येथील गुंजाळ नाक्याजवळ शीतलच्या डोक्यात दगड घालून तिचा खुन केला.
१४ मार्च रोजी रात्री ही घटना घडली.
मागील अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे या खुनाचा तपास करीत होते.
परंतु, खुन झालेल्या तरुणीची ओळख पटत नव्हती.
दरम्यान, शीतलचा खुन केल्यानंतर ज्ञानेश्वर पुन्हा शिरुर कासार येथे गेला.
त्याने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसर्या मुलीबरोबर लग्न केले. या पत्नीला दागिने खरेदी करण्यासाठी त्याने सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय २५, रा. शिरुर कासार) याला दागिने घेऊन घरी बोलावले.
त्याचा खुन केला.
त्यानंतर विशालचा मृतदेह मामाच्या दुचाकीवरुन त्याने भातकुडगाव येथे स्वत:च्या शेतात नेऊन पुरवला. विशाल याचा शोध पोलीस घेऊ लागले.
तेव्हा त्यांना विशालचा खुन झाल्याचे समजले.
पण तेव्हा ज्ञानेश्वर फरार होता.
पोलिसांनी त्याचा मामा अजिनाथ गायके याच्याकडे चौकशी सुरु केली.
अगोदरच भाचा ज्ञानेश्वरविषयी अनेक तक्रारी त्याच्या कानावर येत होत्या.
त्यात पोलिसांचा ससेमिरा सुरु झाल्याने मामा गायके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
इकडे विशालचा खुन झाल्याचे समजल्याने त्याचे वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे (वय ७०) यांना मोठा धक्का बसला.
त्यात त्यांचा मृत्यु झाला.
पोलिसांनी विशालच्या खुन प्रकरणात ज्ञानेश्वर गायकवाड याला अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत राहुरी फॅक्टरी येथील तरुणीच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला.
शीतल भामरे हिचा खुन केल्याची कबुली ज्ञानेश्वरने दिली.
सध्या तो विशाल कुलथे यांच्या खुन प्रकरणात पोलीस कोठडीत आहे.
एकाच्या कृत्यामुळे तब्बल चार जणांना आपले प्राण गमवावे लागले.
कृपया हे देखील वाचा:
बदलापूरातील केमिकल कंपनीतून वायू गळती; 3 किमी परिसरातील नागरिकांना झाला श्वसनाचा त्रास
लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू
पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर
गरीब आणि वंचितांसाठी चालणार मोदी सरकारचे विशेष अभियान, बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या
ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद