नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र-हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकमध्ये गेल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी राहुल गांधी व्हिस्टारा एअरलाईन विमानाने बँकॉकला गेले. राहुल गांधी बँकॉकमध्ये का गेले ? हे अद्याप समजू शकलेले नाही आणि तेही अश्या वेळी जेव्हा दोन राज्यात फक्त दोन आठवड्यांनंतर निवडणुका आहेत आणि कॉंग्रेस अंतर्गत वादात अडकली आहे, तेव्हा राहुल गांधी बँकॉकमध्ये जाण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी २०१५ मध्ये त्याच्या बँकॉकमध्ये जाण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, बँकॉक ट्विटरवर अव्वल स्थानावर ट्रोल होत आहे. दोन्ही राज्यात कॉंग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
राहुल गांधींच्या बँकॉकला जाण्याबाबत शंका व्यक्त करत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट केले की, “बँकॉक ट्रेंड का करतोय याबद्दलही तुम्हाला आश्चर्य आहे का ?” मात्र, कॉंग्रेसने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. २१ ऑक्टोबरला दोन्ही राज्ये मतदान करतील आणि २४ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्रात मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षात लोकशाहीची कमतरता असल्याचा आरोप करत कॉंग्रेसचा प्रचार न करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी हरियाणामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी तिकीट वितरणात कडक कारवाई केल्याचा आणि राहुल गांधींना बाजूला सारल्याचा आरोप करून पक्षाचा राजीनामा दिला आहे.
राहुल गांधी २०१५ मध्येही बँकॉकमध्ये गेले होते. त्यानंतर ६० दिवसांच्या सुट्टीनंतर ते भारतात परतले. त्यावेळी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इतकी लांब रजा घेतल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. राहुल गांधी १६ फेब्रुवारी २०१५ रोजी बँकॉकला रवाना झाले आणि अगदी दोन महिन्यांनंतर १६ एप्रिल रोजी ते घरी परतले. त्यावेळी बँकॉकसह त्यांनी आग्नेय आशियाई देशांचा दौरा केला असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला हरल्याची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या पक्षाची सध्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. कॉंग्रेस कार्यकारी समितीने राहुल गांधी यांना अध्यक्षपदावर कायम रहावे यासाठी मनापासून प्रयत्न केले, पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
Visit : bahujannama.com