Rahul Gandhi Maharashtra Tour | निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने कंबर कसली; मल्लिकार्जुन खरगे अन् राहूल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई: Rahul Gandhi Maharashtra Tour | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह देशभरातील दिग्गज नेते महाराष्ट्रात सभा घेणार असल्याची माहिती आहे.
त्यानंतर आता काँग्रेसनेही कंबर कसली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी माहिती दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, ” काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून, सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उपस्थित राहणार आहेत”, असे नाना पटोले यांनी सांगितले.
Comments are closed.