नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत आज (शुक्रवारी ) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ उडाला. हा गोंधळ इतका वाढला की एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत ही गोष्ट पोहचली त्याचे रूपांतर धुक्का-बुक्कीत झाले. खरं तर एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी राहुल गांधींच्या ‘दांडक्याने मारण्या’च्या विधानाचा उल्लेख केला आणि टीका करण्यास सुरुवात केली. सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार माणिकम टागोर हर्षवर्धन यांच्या जागेवर पोहोचले आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. ताबडतोब भाजप खासदार वेलमध्ये आले आणि त्यांनी कॉंग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांना पकडले आणि धुक्का-बुक्की सुरू झाली. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शुक्रवारी लोकसभेत गदारोळ झाला. हा गोंधळ इतका वाढला की हे प्रकरण धुक्का-बुक्कीपर्यंत पोहोचले. खरं तर एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी राहुल गांधींच्या दंडेमार विधानाचा उल्लेख केला आणि टीका करण्यास सुरवात केली. सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.